छत्रपती संभाजीनगर. :: नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित रुख्मिणीताई कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय अंमळनेर जिल्हा जळगाव आयोजित श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि ऑल इंडिया राईट असोसिएशन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आज “शास्वत आणि सर्वसामावेशक शहरी विकास आणि सामाजिक चळवळ” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

या राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक, वैज्ञानिक आणि संस्कृतीक अश्या विविध गुणांचा आदर्श घेत राष्ट्रासाठी शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपले योगदान देत आहात त्यामुळे आपला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन दादासाहेब कांबळे यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्याम पवार, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद संचालक सुनील गरुड प्राचार्य डॉ.एस जे शेख, ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशनचे प्रमोद पाटील, प्रा. डॉ. युवराज मानकर, प्रा. डॉ. किरण काळे प्रा. सुनील वाघमारे, उपस्थित होते.

या परिषदेत मोठया संख्येने संशोधक, प्राध्यापक आणि सर्व विषयांचे अभ्यासक मंडळी उपस्थित होती.
दादासाहेब कांबळे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *