छत्रपती संभाजीनगर. :: बांगलादेशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने आज क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी विरोधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळी आ. दानवे म्हणाले की, बांग्लादेशात हिंदू समाजावर सातत्याने अत्याचार होत आहेत. अन्याय, अत्याचार व दडपशाहीने हिंदू समाज दहशतीखाली आहे. भारतीय ध्वज तिरंग्याचा अपमान करणाऱ्या धर्मद्वेषी बांग्लादेशींना प्रत्युत्तर देत हिंदू समाजाचा सन्मान टिकावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.

यावेळी कार्यकर्त्यांनी बांग्लादेशाचा ध्वज जाळून आणि रस्त्यावर तुडवून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी करु नका हिंदू द्वेष ..शांत ठेवा बांग्लादेश.. इस्कॉन मानवतावादी, नाही दहशतवादी.. बांग्लादेशी हिंदूओ पर, हमले बंद करो.. बांग्लादेशी हिंदू के सन्मान में, शिवसेना मैदान में.. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, संतोष जेजुरकर, गोपाळ कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *