छत्रपती संभाजीनगर : बदलापूरमध्ये ज्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे यानं अत्याचार केले होते त्या शाळेतली एक अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात ती मुलगी सापडली. रेल्वेने प्रवास करून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. तिथं ती रात्रभर रेल्वेस्थानकातच बसली. दामिनी पथकाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हाा पथकाने धाव घेत तिला ताब्यात घेतलं.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरची १५ वर्षांची सावत्र मुलगी घर सोडून बाहेर पडली. रेल्वेने ती शुक्रवारी रात्री २ वा. शहरात आली शनिवारी दिवसभर स्थानकावर बसून राहिली. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला तिची माहिती देण्यात आली. दामिनी पथकाने लगेच धाव घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले.

दामिनी पथकाने सांगितलं की, बदलापूर अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे. त्या शाळेतून तिने नुकतेच दहावी उत्तीर्ण केली आहे. १५ वर्षीय मुलीच्या आईने दुसरे लग्न केलं. सावत्र वडील तिला त्रास देत होते. कंटाळून ती गुरुवारी रात्री मोबाइल बंद करून घर सोडून निघून आली. पोलिसांनी
विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार कथन केला. महिला पोलिसांनी कुटुंबाला संपर्क केल्यानंतर तिची आई रात्री इकडे निघाली. तिच्या जेवण, राहण्याची व्यवस्था पोलिस करत असल्याचे पाहून मुलीला अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *