छत्रपती संभाजीनगर.: छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, वीस टक्के सर्वसमावेशक योजना व म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत१ हजार ४९४ गाळे,सदनिका व निवासी भुखंडाकरिता फेब्रुवारी-२०२४ च्या जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, (DPC HALL), जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
सोडतीचे लाईव्ह चित्रीकरण यु-ट्युब या समाजमाध्यमावर थेट प्रक्षेपित होणार असून उपरोक्त सोडतीचे प्रक्षेपण अर्जदाराना पाहण्याकरीता यु-ट्युब या समाज माध्यमावरील https://www.vccme.in/Chattrapati-Sambhaji-Nagar
या ऑनलाइन लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी कळविले आहे.