छत्रपती संभाजी नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाईल. ऑनलाईन पद्धतीने २१ मे ला आपला निकाल विद्यार्थी पाहू शकणार आहेत. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या. यंदा राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

mahresult.nic.in, mahahsscboard.in, http://hsc.mahresults.org.in, http://hscresult.mkcl.org, results.gov.in.या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी हे आपला बारावीचा निकाल पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. बारावीचा निकाल 9 विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *